‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्त’ ‘गांडूळ खत निमिर्ती प्रकल्प’ कार्यक्रम

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान आयोजित ‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्त’ ‘गांडूळ खत निमिर्ती प्रकल्प’ कार्यक्रम ‘चव्हाणवाडी,महूद’ येथे संपन्न .

संस्थेच्या विश्वस्त डॉ. केतकी देशपांडे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व आणि अशा भाजीपाल्या  मुळे शरीरास होणारे फायदे  आणि रासायनिक खते वापरामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम याची सविस्तर माहिती दिली. तसेच गांडूळ खताला भविष्यात भरपूर मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. वाटंबरे येथील सुरेश पवार यांनी त्यांच्या ‘यशराज गांडूळ खत प्रकल्पाची उभारणी कशी केली याची माहिती सांगितली. गांडूळ खत वापरून केलेल्या शेतीत उत्पन्न किती जास्त मिळते व  या शेतीचा शेतकऱ्यांना कसा फायदा होत आहे याची माहिती त्यांनी सांगितली.

मागील वर्षी संस्थेने अल्पदरात चव्हाणवाडी येथे 5 गांडूळ बेड दिले होते. त्यात तयार होणारे खत वापरण्यामुळे महिलांच्या शेती उत्पन्नात वाढ झाली आहे. तसेच त्यातून महिलांना उत्पन्न सुरु झाले आहे. गांडूळ खताचा वापर करून डाळिंब आणि चिक्कू चे चांगले उत्पन्न मिळाल्याचे महिलांनी सांगितले. तसेच या वर्षभरात 2 टन उत्पन्न मिळाल्याची माहिती दिली. सुरेश पवार व कल्पना चव्हाण यांनी ‘गांडूळ बेड’ कसा तयार करावा याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी 5 गांडूळ बेड देण्यात आले.