उत्कर्ष उच्च माध्यमिक विद्यालयात 11 वी च्या वर्गाचे उद्घाटन संपन्न

आजकालचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने विद्यार्थ्यानी शालेय परिक्षेबरोबर जीवनाच्या परिक्षेत यशस्वी होवून आपला व विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा असे मत पुणे येथील शिक्षणतज्ञ गायत्री सेवक यानी व्यक्त केले, उत्कर्ष विद्यालयात या वर्षीपासून उच्च माध्यमिक विद्यालय सुरु होत असुन 11 वी च्या शास्त्र व वाणिज्य विभागास मान्यता मिळाली आहे. त्या निमित्ताने आयोजित केलेल्या उद्घाटन व विद्यार्थी स्वागत समारंभात गायत्री सेवक बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर संस्था- अध्यक्ष
डॉ.संजीवनी केळकर. उपाध्यक्ष माधवी देशपांडे, वसुंधरा कुलकर्णी, श्रीकांत बिडकर,प्रा.राजेंद्र ठोंबरे, नूतन प्राचार्य सुनील कुलकर्णी उपस्थित होते.

कार्यकमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली.शुभांगी कवठेकर यानी ईश स्तवन केले. प्राचार्य सुनील कुलकर्णी यानी मुलांना मौलिक मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ.केळकर म्हणाल्या की, शिक्षणातून मन,मनगट आणि मेंदू बळकट होणे अपेक्षित आहे.शिक्षकांकडून या दृष्टीने प्रयत्न होणे अपेक्षित असल्याचे मत डॉ. संजीवनी केळकर यानी व्यक्त केले.संस्था त्या साठी खंबीरपणे प्रशासनाच्या पाठीशी असल्याचे शेवटी त्यानी सांगितले.यावेळी श्रीकांत बिडकर यानी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मिठाई भरवून व शैक्षणिक साहित्य भेट देवून स्वागत करण्यात आले, कार्यक्रम प्रास्ताविक प्रा.सुदर्शन भंडारे, आभार प्रदर्शन मजगे मॅडम व सुत्रसंचालन मेटकरी मॅडम यांनी केले.