OVERVIEW
Projects
Our Trustees
Success Stories
WORK AREA
Women Empowerment
Child Development
Upliftment of Rural Mass
Utkarsha Vidyalaya
Revival of Traditional Art
FOCUS AREA
Education
Health
Financial Independence
Working for Women Facing Atrocity & Injustice
Environmental Awareness

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या आरोग्यदूत विभागातर्फे 
               गळवेवाडी येथे व्यक्तिमत्व विकास शिबीर संपन्न

          माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान चा आरोग्यदूत प्रकल्प गेली 6 वर्षे सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात कार्य करीत आहे. मागील सहा  वर्षात आरोग्यदूत च्या सहकार्याने संस्थेने ग्रामीण भागातील गरोदर माता व एक वर्षाच्या आतील बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी काम केले.
          या प्रकत्पाअंतर्गत सोनंद मध्ये अंगणवाडी शिक्षिका व ‘आशा’ कार्यकत्र्यांचे दिनांक  7/9/13 रोजी ‘आरोग्यदूत’ प्रषिक्षण आयोजित केले होते. या प्रषिक्षणात 14 जणींचा सहभाग होता. हे प्रशिक्षण  महिन्यातून एकदा  असे चार वेळा घेण्यात आले. या प्रशिक्षणात गळवेवाडी मधील अंगणवाडी शिक्षिकेने त्यांच्या गावाची माहिती दिली. गळवेवाडी गावची लोकसंख्या 917 आहे. हे गाव सांगोल्या पासून 26 किलोमिटरवर आहे. या गावात जाण्या येण्यासाठी वाहनांची सोय नाही व गावातील लोक आरोग्यसेवे पासून वंचित आहेत. सर्व लोक शेती करतात.  या गावाला आरोग्यसेवा मिळावी, गरोदर महिला व 1 वर्षाच्या आतील बालकांचे आरोग्य सुधारावे, माता मृत्यूदर व बालमृत्यूदर कमी व्हावा, गावात आरोग्याबाबत जागृती व्हावी. गावामध्ये बचतगट सुरू करावे, गटाच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने गळवेवाडी मध्ये आरोग्यदूत प्रकल्प सुरू केला.
   गळवेवाडी मध्ये 1 ली ते 7 वी पर्यतच्या 136 मुलांची आरोग्य तपासणी बालरोग तज्ज्ञ डाॅ. सुपर्णा केळकर यांनी केली., व 65 मुलांना रक्तवाढीची औषधे दिली, बचतगटातील 86 महिलांची ब्लडग्रुप तपासणी केली व 96 महिला व मुलांची हिमोग्लोबिन तपासणी व 40 वर्षापुढील 26 महिलांची ब्लडशुगर तपासणी केली.
       याच उपक्रमाअंतर्गत गळवेवाडी येथे दिनांक 29/7/14 रोजी  प्राथमिक शाळेतील 5 वी ते 7 वीच्या विदयाथ्र्यांसाठी  मुलांचा सर्वागिण विकास व्हावा, मुलांना शालेय शिक्षणापेक्षा इतर ज्ञान मिळावे, या साठीश्व्यक्तिमत्व विकास शिबीर घेण्यात आले.
   शिबीराची सुरूवात सरस्वतीच्या प्रतिमापूजनाने झाली. नंतर मुलांची प्रार्थना धेतली व प्रार्थनेनंतर मा. सुनिल बिडकर यांनी मुलांशी  अत्यंत सहजतेने व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय? आपला स्वभाव कसा असावा? या विषयावर चर्चा केली. त्यामध्ये रागीट, मनमिळाऊ, लाजाळु, भित्रा, शांत या स्वभावाची उदाहरणे देऊन मुलांना सांगितले. स्वभावामध्ये केव्हा रागीट, केव्हा शांत रहावे, वेळेनुसार आपण वागले पाहीजे, अन्याय होत असेल तर आपण आवाज उठवलाच पाहीजे, तेथे शांत स्वभाव असून चालत नाही. अशी अनेक उदाहरणे देऊन मुलांना मार्गदर्षन केले.
      मा. प्रशांत भोसले यांनी मुलांचा ‘हम कितने है भाई कितने है?  आप चाहे जितने है,‘  हा खेळ घेतला. या खेळातून मुलांच्या मध्ये एकीची व मैत्रीची भावना निर्माण झाली.
      मा. संचित राऊत यांनी मुलांचा टॅंनिग्राम हा खेळ घेतला. या खेळामध्ये प्रत्येक मुलाला दोन मोठे त्रिकोण, दोन लहान त्रिकोण, एक दोन्ही त्रिकोणाच्या मध्यला त्रिकोन,कापणी आकार, व चैकोण, असे सात भाग दिले व त्या आकारापासून वेगवेगळे प्राणी, पक्षी, चित्रे असे करण्यास सांगीतले. या खेळामधून मुलांच्या कल्पना शक्तीला वाव मिळाला. मुलांनी विविध आकार तयार केले. या खेळात मुले खूप रमली होती.
     मा. संचित राऊत यांनी मुलांचे खेळ व गाणी यातून मनोरंजन केले. मुलांना गाणी खूपच आवडली. खेळामध्ये अडथळयाचा खेळ घेतला. यामध्ये डोळे बंद करून फळयावर नाव लिहिणे, डब्यातील लाडू खाऊन पाणी पिणे असा हा खेळ मुलांना खूपच आवडला. यातून अंध व्यक्तींना व वृध्द व्यक्तींना मदत करणे हा संदेश मुलांपर्यत पोचविण्याचा प्रयत्न केला. या खेळामध्ये मुलांनी अत्यंत मोकळेपणाने भाग घेतला.
गंगा पवार यांनी मुलांच्या विचाराला चालना मिळावी या उद्देषाने काही शाब्दिक खेळ घेतले. उदा:- ‘ळ’  ने संपणारे शब्द  उदा:-1) जखम झाल्यावर पायाला येते ती  - कळ
2) एकमेकांच्या खूरापती काढणे व भांडण करणे - उखाळया पाखाळया  असे अनेक प्रश्न मुलांना विचारून उत्तरे शोधण्यास सांगीतले.  
     या नंतर मुलांना कागदापासून टोप्या तयार करण्यास शिकविल्या. सौ. गंगा पवार यांनी मुलांना लेझीम शिकविले. लेझीम मुले मनापासून शिकत होती.
      मुलांना दिवसभराचे शिबीर खूप आवडले. ‘माझा दिवस खूप मजेत गेला अशी  शिबीरे सारखी घ्यावी, खूप मजा आली.’ असे मुलांनी मनोगतातून सांगितले.
 
         समारोपामध्ये डाॅ. संजीवनी केळकर यांनी मुलांना अशा शिबीरास आपण उपस्थित राहून त्याचा उपयोग करून घ्यावा,व व्यक्तिमत्व  संपन्न करावे असे सांगितले. समारोप सत्रात  मुलांना परसबागेत लावण्यासाठी बियाणे देण्यात आले या बियाणांपासून ज्यांची परसबाग चांगली फुलेल त्याला बक्षिस देण्यात येईल असे  ही सांगितले.
          या व्यक्तिमत्व शिबीरास डाॅ. संजीवनी केळकर,  आरोग्यदूत प्रकल्पाच्या निरीक्षक सौ. मंगल कुलकर्णी, गळवेवाडी शाळेचे मुख्याध्यापक मा. अशोक बाबर, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी शिक्षिका, संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचलन  मा. प्रशांत भोसले यांनी केले

.