OVERVIEW
Projects
Our Trustees
Success Stories
WORK AREA
Women Empowerment
Child Development
Upliftment of Rural Mass
Utkarsha Vidyalaya
Revival of Traditional Art
FOCUS AREA
Education
Health
Financial Independence
Working for Women Facing Atrocity & Injustice
Environmental Awareness

मुलींनी आईला जिवलग मैत्रिण बनविले पाहिजे: गौरी तेजवानी


सांगोला (अरुण बोत्रे ) : ‘आई आणि मुली` मध्ये मैत्रीचे सर्वोत्तम नाते पाहिजे . मुलीनी आईला जिवलग मैत्रिण बनविले पाहिजे . मुलीनी स्व :ताच्या पायावर आत्मविश्वासाने उभे राहीले पाहिजे . मन सक्षम कार्यक्षम केले पाहिजे असे विचार टि.व्ही कलाकार सौ . गौरी तेजवानी यांनी व्यक्त केले . माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान व भारतीय स्त्री शक्ती सांगोला यांच्या संयुक्त विधमाने जागतिक ग्रामीण महिला दिनानिमित्त आयोजित बचतगट महिला मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणुन सौ . तेजवानी बोलत होत्या . अध्यक्षस्थानी सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड होते. याप्रसंगी व्यासपीठावर माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या डॉ.सौ संजीवनी केळकर, सौ . हेमा डबीर ,वसुंधरा कुलकर्णी ,डॉ उषा देशमुख,प्रा चित्रा कांबळे, सभापी सौ सुरेखा सुर्यगण,माधवी देशपांडे आणि अॅाड. राजेश्वरी केदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मुलगी आणि आई या नातेसंबंधावर बोलतांना सौ. गौरी तेजवानी म्हणाल्या की, मुलीच्या जडणघडणीमध्ये आईच्या वाटा महत्वाच्या असतो त्यात माता आपले सर्वस्व ओतते. मुलीच्या संपूर्ण आयुष्यातील सुखाच्या विचार आई करते . मुलीच्या चांगल्याच्या ध्यास आईस कायम असतो . मुलीच्या सर्व गोष्टीवर तिचे बारीक लक्ष असते . आदर्श माता बनण्याच्या प्रयत्न केला पाहिजे. मुलीच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन आई मुलीच्या चांगल्या कामाला प्रोत्साहन देत असते. महिलांनी मुलींना शारिरीक दृष्ट्या कणखर, सदृढ बनविन्याबरोबरच शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनविले पाहिजे असे सौ. तेजवानी यांनी सांगितले.

अध्यक्षपदावरून बोलतांना गायकवाड म्हणाले कि, महिलांनी जागरूक राहून आपल्या कामाच्या जोरावर जनतेत विश्वास निर्माण केला पाहिजे. मुलींना प्रतिकार शक्ती आहे. क्रीडा क्षेत्राबरोबरच सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात महिलांनी बचत गटाच्या उद्दिष्टासाठी आपल्या पायावर आत्मविश्वासाने उभे राहिले पाहिजे. महिलांच्या कल्याणाच्या योजना त्यांचा पर्यंत पोहोचण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे.

मुली सक्षम झाल्या पाहिजेत साऱ्या अर्थाने महिलांच्या विकास झाला पाहिजे असे सांगून बाबुराव गायकवाड यांनी महिला आरक्षण, शिक्षण,स्रीभ्रुणहत्या,सकस आहार, महिला बचतगट,ग्रामीण भागातील शौचालय, महिला दुधसंस्था याविषयावर उद्बोधक मार्गदर्शन केले. सभापती सौ.सुरेखा सुर्यगण यांनी माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेच्यावतीने सुरु असलेल्या समाजोपयोगी कामाच्या उल्लेख करून संस्थेच्या कार्याच्या गौरव केला. जनकल्याण मल्टीस्टेट महिला को ऑफ. सोसायटीचे जयंत शेलगीजकर यांनी बचतगटाना -बचतगटा सभासदांना जनकल्याण पतसंस्थेमार्फत तारणाशिवाय कशापद्धतीने कर्ज दिले जाते. याविषयी महिलांना सविस्तर माहिती दिली.

सुरुवातीस संस्थेच्या बचतगटाविभाग प्रमुख अॅतड. सौ. राजेश्वरी केदार यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच आर्थिक स्वावलंबनासाठी अनेक विभागामार्फत कसे काम केले जाते याची माहिती दिली. श्रमलक्ष्मी पुरस्कार विजेत्या सुमन सोनार यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन आणि मैत्रीत कुटुंब सल्ला केंद्र या विभागातून यशस्वी झालेल्या महिलांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्यावतीने चित्तथरारक असे शौर्य सादरीकरण प्रात्याक्षिकाचा कार्यक्रम पार पडला. सुरुवातीस बचतगट महिला सभासदांच्यावतीने तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंच्या स्टॉलचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. प्रा. चित्रा जांभळे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सुनिल बिडकर यांनी केले.

.