OVERVIEW
Projects
Our Trustees
Success Stories
WORK AREA
Women Empowerment
Child Development
Upliftment of Rural Mass
Utkarsha Vidyalaya
Revival of Traditional Art
FOCUS AREA
Education
Health
Financial Independence
Working for Women Facing Atrocity & Injustice
Environmental Awareness
प्रमोद कुलकर्णी, सेवावर्धिनी

काल मी सोलापूर जिल्ह्य़ाच्या सांगोला तालुक्यातील वाटंबरे गावात गेलो होतो. या गावातील तरुण व गावाच्या तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष श्री मधुकर पवार सेवावर्धिनीच्या जलदूत प्रकल्पातील एक सहभागी जलदूत आहे. माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान ही संस्था या तालुक्यात गेली 37 वर्षे काम करत आहे. या जलदूत प्रकल्पातील सहभागी 20 संस्थांच्या 40 जलदूतांना 1 वर्षाचे पाणी व जलसंधारणाचे शास्त्रीय प्रशिक्षण दिले आहे.
या प्रशिक्षणाच्या शेवटच्या कार्यशाळेत आपल्या गावाचा विकासाचा विस्तृत आराखडा- DPR मांडायला सर्वांना सांगितले होते. सर्वात उत्तम 5 सादरीकरणांना पारितोषिके ठेवली होती. या सादरीकरणातील रु 3 लाखाचे पहिले पारितोषिक वाटंबरे गावच्या मधुकर पवारच्या सादरीकरणाला मिळाले होते. या रकमेतून गावात जलसंधारणाचे काही काम करण्याचा प्रस्ताव गावाने द्यावा असे आम्ही सांगितले होते. त्यानुसार या गावाने जी कामे सुचवली आहेत ती पाहण्यासाठी काल गेलो होतो. संपूर्ण गावानं काल आमचं उत्साहाने स्वागत केलं. ग्रामस्थांबरोबर झालेल्या कार्यक्रमाला 250 ग्रामस्थ - तरुण, महिला, मुले, मुली - उपस्थित होते. पाण्याच्या प्रश्नावर उत्तम चर्चा झाली. त्यानंतर site visit मधे ग्राम पंचायत सदस्य, ग्रामसेवक, कृषिसेवक, पाटबंधारे विभागाचा ज्यु इंजिनिअर, तरुण कार्यकर्ते असे 15/20 जण सहभागी होते. या उन्हाळ्यात तिथे 2 कामे आम्ही करु.
गावात असे कर्तृत्ववान तरुण महिला - पुरुष काही ना काही चांगले काम करत आहेत. आपण त्यांना भेटणे/ संपर्क करणे गरजेचे आहे हे या निमित्ताने आम्हाला लक्षात आले.
वरती टाकलेला फोटो त्यांनी भेट म्हणून दिलेल्या "वानवळ्या" चा आहे. शेतकरी राजाच्या उदार मनाचं दर्शन (परत एकदा) झालं.
Apple Ber चं पत्रक म्हणजे दुष्काळी परिसरातही जिद्दीने आपली शेती समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्याच्या कर्तृत्वाची माहिती आहे.
केल्याने देशाटन... हे पुन्हा एकदा मनावर ठसलं..!
वाटंबरेच्या निर्मळ मनाच्या साध्यासुध्या ग्रामस्थांना आदरपूर्वक नमस्कार..!
या प्रकल्पाला Atlas Copco कंपनी ने त्यांच्या CSR अंतर्गत अर्थसहाय्य केले आहे. या भेटीमध्ये कंपनीचे 3 अधिकारी सहभागी होते.